गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना: एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना किंवा शेती क्षेत्राशी निगडित इतर कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये व अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबीयांस गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात.
आपण शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याला उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने तसेच त्याला विमा सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना महत्वाचे बदल
- 2023 मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले.
- या योजनेचे नाव आता “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” असे आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक नाही.
- आता विमा रक्कम आणि लाभांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
- या योजनेनुसार, आता शेतकऱ्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांना (आई-वडील, पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यापैकी एक) अपघात विमा संरक्षण मिळेल.
- शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून त्रास होत असल्यामुळे, आता शासन स्वतःच विमा लाभ देईल.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील शेतकऱ्यांचा शेतात काम करताना किंवा शेती क्षेत्राशी संबंधी काम करताना अपघात मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देणे हा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य देणे हा आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये.
- शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अपघातामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण प्रदान करणे.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे लाभार्थी
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई, वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा फायदा
- एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास सरकार कडून त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
- अपघात मृत्यू: जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते.
- पूर्ण अपंगत्व: अपघातामुळे शेतकरी पूर्णपणे अपंग झाल्यास त्याला 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते.
- अंशतः अपंगत्व: अपघातामुळे शेतकरी अंशतः अपंग झाल्यास त्याला 1 लाख रुपयांपर्यंत मदत मिळते.
- इतर लाभ: या योजनेतून इतरही काही लाभ उपलब्ध आहेत जसे की वैद्यकीय खर्च, अंत्यसंस्कार खर्च आणि शिक्षण खर्च.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत समाविष्ट अपघाताची कारणे
- अंगावर वीज पडून मृत्यू होणे
- विजेचा शॉक लागून मृत्यू
- पाण्यात बुडून मृत्यू
- पूर
- नैसर्गिक आपत्ती
- सर्पदंश
- विंचू दंश
- बाळंतपणातील मृत्यू
- रेल्वे अपघात
- वाहन अपघात
- रस्त्यावरील अपघात
- उंचावरून पडून झालेला अपघात
- जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा
- खून
- दंगल
- नक्षलवाद्यांकडून हत्या
- हिंस्त्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे.
खालील कारणासाठी शेतकऱ्यास लाभ दिला जाणार नाही
- नैसर्गिक मृत्यू
- विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व
- आत्महत्या
- आत्महत्येचा प्रयत्न
- अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात
- स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे
- मोटार शर्यतीतील अपघात
- गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
- बाळंतपणातील मृत्यू
- सैन्यातील नोकरी
- जवळच्या लाभार्थ्यांकडून / वारसाकडून खून
- भ्रमिष्टपणा
- शरीरांतर्गत रक्तस्त्राव
- युद्ध
दावा सादर करण्याचा कालावधी
अपघात झालेल्या शेतकऱ्याचा दावा अर्ज विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतर देखील 30 दिवसांपर्यंत विमा कंपनीकडे सादर करता येईल.
अपघातग्रस्ताचे निधन झाल्यास त्यांच्या कुंटुंबातील वारसदाराची निवड व सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्य क्रमानुसार अदा केली जाईल
1. अपघातग्रस्त यांची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती
2. अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी
3. अपघातग्रस्ताची आई
4. अपघातग्रस्ताचा मुलगा
5. अपघातग्रस्ताचे वडिल
6. अपघातग्रस्ताची सुन
7. अन्य कायदेशीर वारसदार
गोपीनाथ मुंडे अपघात विमा आवश्यक पात्रता
- ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- ज्या व्यक्तींचे 7/12 वर नाव नाही पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे अशा कुटुंबातील कोणताही 1 सदस्य या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
योजनेच्या अटी व शर्ती
- मूळ रहिवाशी: अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- शेतकरी कुटुंब: अर्जदार व्यक्ती शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
- केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- वयोमर्यादा: अर्जदार व्यक्तीचे वय 10 ते 75 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- दावा कालावधी: विमा कालावधी संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत दावा अर्ज जमा न केल्यास अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही.
- सदर योजने अंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्याने / शेतकऱ्याच्या कोणत्याही वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत.
- विमाधारकाला स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक नाही..
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे Gopinath Munde Shetkari Vima Yojana Document
- ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड
- पत्त्याचा पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल, आधार कार्ड
- जमिनीचा उतारा: 7/12 उतारा
- शेतकरी प्रमाणपत्र: शेतकरी दाखला किंवा ग्रामपयत कार्यालयामधून शेतकरी असल्याचा दाखला.
- दावा अर्ज
- अपघातग्रस्तांचा वयाचा दाखला: जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड
- बँक खात्याची माहिती: बँक खाते पासबुक झेरॉक्स, कॅन्सल चेक
- एफ.आय.आर कॉपी: पोलिसांनी दिलेला
- एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
- इंनक्वेस्ट पंचनामा
- मृत्यू दाखला
- अपंगत्वाचा दाखला: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला
- घोषणापत्र
- फोटो: पासपोर्ट आकाराचा फोटो
- अपघात घटनास्थळ पंचनामा: पोलिसांनी दिलेला
- पोष्ठ मार्टेम रिपोर्ट: डॉक्टरांनी दिलेला
- कृषी अधिकारी पत्र
- औषधोपचाराचे कागदपत्र
- डिस्चार्ज कार्ड: डॉक्टरांनी दिलेले
दावा अर्ज करण्याची पद्धत
जेव्हा शेतकऱ्याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदार यांनी दावा अर्ज व सोबत सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत दावा अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्ती शेतकरी कुटुंबातील नसल्यास
- विमा कालावधीपूर्वी अपंगत्व आल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराला आत्महत्येचा प्रयत्न करताना अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास दावा अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
दावा अर्ज करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
- अर्ज करण्यापूर्वी पात्रता व निकष तपासून घ्या.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची तपासणी करा
- अर्ज अचूक व संपूर्ण भरा
- अर्जात खोटी माहिती भरून नका.
Gopinath Munde Apghat Vima Yojana PDF
Gopinath Munde Apghat Vima Yojana PDF
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
महत्वाची गोष्ट
या योजनेचे नियम आणि अटी यामध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे योजनेच्या अचूक माहितीसाठी अधिकृत पोर्टल ला किंवा आपल्या क्षेत्रातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.
महत्वाचे मुद्दे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सध्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून ओळखली जाते
राज्यातील शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा एक महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम 32.23 रुपये निर्धारित केली गेली आहे जी शासनामार्फत दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला अदा करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला विमा हप्त्याची रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिले जाणारे आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई वडील, लाभार्थीचे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही 1 व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र शासनाद्वारे दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला विम्याची रक्कम अदा केली जाते.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!