E Pik Pahani Online Registration Process 2024:फक्त 2 मिनिटांत करा ई पिक पाहणी नोंदणी प्रक्रिया. - Thejobwalaa

E Pik Pahani Online Registration Process 2024:फक्त 2 मिनिटांत करा ई पिक पाहणी नोंदणी प्रक्रिया.

thejobwalaa.in- yogesh
7 Min Read

E Pik Pahani Online Registration Process 2024:फक्त 2 मिनिटांत करा ई पिक पाहणी नोंदणी प्रक्रिया.

E Pik Pahani Online Registration Process 2024 – सर्व शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या सातबारा वरती शेतात असलेल्या पिकाची माहिती पेऱ्यामध्ये लावण्याकरिता आपल्या गावच्या तलाठी कार्यालयातला चक्करा माराव्या लागत असत, आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या सातबारावरती त्यांच्या शेतात असलेल्या पिकाची नोंद ही केली जात होती. परंतु ई पीक पाहणी या शासनाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण असलेल्या प्रकल्पामुळे शेतकरी वर्गांना पीक पेरा लावण्यासाठी तलाठी कार्यालयाला जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

E Pik Pahani Online Registration Process 2024

तो आता स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या जमिनीचा पेरा हा सातबारा वरती लावू शकतो आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या लेखांमध्ये सविस्तर पाहूया.

ई पिक पाहणी अर्ज प्रक्रिया 2024 E Pik Pahani

ई पिक पाहणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी खालील सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या करू शकतात.

ई पिक पाहणी करण्याकरिता शेतकऱ्यांना सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंकच्या सहाय्याने ई पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन प्ले स्टोअर च्या माध्यमातून डाऊनलोड करून घ्यावे लागेल.

Download  ई पिक पाहणी अर्ज प्रक्रिया 2024

वरील एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर एप्लीकेशन ओपन करून घ्यावी. ई पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन चालू केल्यानंतर खाली दिलेल्या पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होईल त्यामध्ये डाव्या साईडला स्क्रोल करून घ्या.

त्यानंतर आपल्यासमोर महसूल विभाग निवडा असे ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपले महसूल मंडळ निवडून घ्या. जसे की,

E Pik Pahani Online Registration Process 2024

  • छत्रपती संभाजीनगर,
  • अमरावती,
  • कोकण
  • नागपूर
  • नाशिक आणि
  • पुणे

आपण ज्या महसूल मंडळामध्ये असाल ते मंडळ निवडावे. महसूल मंडळ निवडल्यानंतर पुढे जा या रो वरती क्लिक करा.

महसूल मंडळ निवडून झाल्यानंतर आपल्यासमोर लॉगिन करण्याकरिता ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपण शेतकरी म्हणून ई पिक पाहणी करणार आहोत म्हणून शेतकरी लॉगिन करा या ऑप्शनच्या सहाय्याने तुम्ही लॉगिन करून घ्या.

या पर्यायावर ती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मोबाईल नंबर प्रविष्ट करा असे दिसेल त्यामध्ये मोबाईल नंबर टाकावा.

E Pik Pahani

E Pik Pahani Online Registration Process 2024

त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा विभाग निवडा ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपला विभाग निवडून घ्या तसेच जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव व्यवस्थित रित्या निवडून घ्यावे.

सर्व झाल्यानंतर आपल्याला खातेदार निवडा असे ऑप्शन दिसेल त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव शोधण्याकरिता तेथे विविध ऑप्शन किंवा पर्याय दिसतील त्यापैकी आपल्याला जो सोयीस्कर वाटेल तो निवडावा जसे की पहिले नाव, यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या नावाच्या सहाय्याने शेतकरी निवडता येईल.

तसेच जर शेतकऱ्यांचा गट नंबर माहिती असेल तर याच्या साह्याने देखील तुम्ही सहजपणे आपले नाव निवडू शकता.

E Pik Pahani Online Registration Process 2024

Crop Insurance: पुढील 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा

शेतकऱ्यांचा गट क्रमांक टाकल्यानंतर त्या गटांमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांची नावे आपल्याला खातेदार निवडा या पर्यायांमध्ये दिसतील त्यापैकी तुम्ही तुमचे नाव निवडून द्यावे. आणि पुढे जा या अर्रो ला क्लिक करून घ्या.

 

E Pik Pahani Online Registration Process 2024

दिलेल्या मोबाईल क्रमांक वरती ओटीपी पाठवण्याकरिता सूचना दिसेल जसे की आपली नोंदणी खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर करण्यात येईल आणि जर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही आपला मोबाईल क्रमांक बदलू शकता.

जर दिलेली सर्व माहिती व्यवस्थित आणि बरोबर असेल तर पुढे जा या ऑप्शन वरती क्लिक करून आपली नोंदणी करू शकता.

पुढे जा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जर आपल्याला दुसऱ्या फोटोमध्ये दाखवलेल्या प्रमाणे जर सूचना दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमची नोंदणी अगोदरच ई पिक चा पोर्टल वरती झालेली आहे. जर असे दिसत असेल तर तुम्हाला पुढे जायचे आहे असे विचारेल तर होय या पर्यायाचा वापर करून पुढे जावे.

E Pik Pahani Online Registration Process 2024

पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक 4 अंकी संकेतांक क्रमांक हा पाठवला जाईल याच्याच साहाय्याने तुम्हाला तुमच्या शेताची ई पिक पाहनी करता येईल.

सर्वप्रथम तुम्ही तुमचे नाव खातेदाराचे नाव या पर्याया मधून निवडून घ्यावे आणि तुम्हाला मिळालेला चार अंकी संकेतांक क्रमांक खालील पर्यायांमध्ये टाकावा.

E Pik Pahani

जर तुमच्याकडे सांकेतांक क्रमांक उपलब्ध नसेल तर सांकेतांक विसरलात या पर्यायाच्या सहाय्याने तुम्हाला संकेतांक क्रमांक परत मिळवता येईल.

तर संकेतिक क्रमांक टाकून घ्या आणि त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे पेज ओपन होईल.

त्यापैकी 2 नंबरचा पर्याय हा शेतीचा ई पिक पाहणी करण्याकरिता वापरला जातो. तर पीक माहिती नोंदवा या पर्यायाला निवडून घ्यावे.

पीक माहिती नोंदवा हा पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शेतीचा संपूर्ण डाटा ओपन होईल त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरावी लागेल जसे की,

E Pik Pahani

शेतकऱ्यांचा 8 अ खाते क्रमांक आणि शेतीचा गट क्रमांक हा अगोदरच आपल्याला पोर्टल वरती फिलअप झालेला असेल. जर शेतकऱ्याची जमीन एकापेक्षा अधिक गटामध्ये असेल तर गट क्रमांक या पर्यायांमध्ये विविध गट दिसतील त्यापैकी आपले पिक ज्या गटामध्ये आहे तो गट निवडून घ्या.

गट क्रमांक निवडल्यानंतर तुम्हाला त्या गटातील क्षेत्र दिसेल. त्यानंतर आपल्या पिकाचा हंगाम निवडून घ्या जसे की खरीप हंगाम.

त्यानंतर पिकाचा प्रकार यामध्ये आपले पीक हे फळपीक आहे की पीक तर यापैकी पीक हे ऑप्शन निवडून घ्या.

त्याच्यानंतर आपल्यासमोर पिकाचे नाव निवडा या पर्यायांपैकी आपल्या शेतात असलेले पीक निवडून घ्यावे लागेल जसे की,

  • सोयाबीन,
  • कापूस,
  • तुर,
  • मुग आणि भुईमूग ई.

पिक निवडल्या नंतर पिकाचे क्षेत्र भरून घ्य. आणि जर आपल्या जमिनीत असलेल्या जल सिंचनाचा प्रकार निवडून घ्या.जसे की,

  • कोरडवाहू
  • कालवा
  • बोर वेल
  • विहीर
  • तलाव
  • बंधारा

यापैकी जो कोणता पाण्याचा स्त्रोत असेल तो निवडून द्या.

आपल्या पिकाचा लागवड दिनांक भरून घ्या.

E Pik Pahani अशा पद्धतीने सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्या पिकाचे फोटो अपलोड करावे लागतील. त्याकरिता खाली दिल्या पद्धतीने पिकाचे दोन फोटो अपलोड करून घ्या आणि आपली माहिती जतन करून घ्या.

Vidyalakshmi Yojana 2024 प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना नेमकी काय आहे? तुम्ही या योजनेचा कसा लाभ घेऊ शकत

आपण भरलेल्या पिक पेरा बद्दल माहिती पाहण्याकरिता परत एकदा माहिती नोंदवा याच पर्यायाला क्लिक करून पिकांची माहिती पहा या ऑप्शनला क्लिक करून आपण आपण भरलेल्या पीका बद्दल माहिती पाहू शकता.

आपण भरलेली माहिती ही 24 तासाच्या आत आपण दुरुस्त करू शकता त्यानंतर तुम्हाला भरलेली माहिती मध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे आपण भरत असलेली माहिती काळजीपूर्वक भरून घ्यावी.

जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, याबद्दल माहिती घ्यायची असेल तर होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला गावाचे खातेदारांची पीक पाहणी खाली दिलेल्या फोटो प्रमाणे त्या ऑप्शनला सिलेक्ट करून तुम्ही आत्तापर्यंत झालेल्या ई पिक पाहणी बद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता.

 तर अशा पद्धतीने शेतकरी वर्ग घर बसल्या आणि स्वतःचा मोबाईलचा उपयोग करून ई पीक पाहणी करून स्वतः तुमचा सातबाराचा पेऱ्यामध्ये लागवड केलेल्या पिकाबद्दल माहिती नोंदवू शकता.

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हा ग्रुप private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

Group ला जॉईन साठी –

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *