Engineer Government Job
इंजीनियर झालेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी, NCL मध्ये विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?
Engineer Government Job | NCL Recruitment 2024 : इंजीनियर झालेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन ( NLC) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात.
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC) भारतातील नवरत्न कंपन्यांपैकी एक आहे. ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (GET) या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत विविध तांत्रिक क्षेत्रातील एकूण 167 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
NCL Recruitment कोणत्या पदांसाठी किती जागा?|Engineer Government Job
- मेकॅनिकल : 84 पदे
- इलेक्ट्रिकल: 48 पदे
- सिव्हिल: 25 पदे
- नियंत्रण आणि उपकरणे: 10 पदे
अर्जाची पात्रता आणि वयोमर्यादा|Engineer Government Job
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी असणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर OBC (NCL) प्रवर्गाला 3 वर्षांची व SC/ST प्रवर्गाला 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत दिली जाते. 1 डिसेंबर 2024 रोजी वयाची गणना केली जाईल.
अर्ज करण्याची फी किती?
- अनारक्षित/ओबीसी (NCL)/EWS साठी: 854 रुपये
- SC/ST/PWD/माजी सैनिकांसाठी: 354 रुपये
Engineer Government Job कसा कराल अर्ज?
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना NLC च्या अधिकृत वेबसाइट www.nlcindia.in ला भेट द्यावी लागेल. येथे ‘करिअर’ विभागात जा आणि “ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनींची भर्ती (GETs)” या लिंकवर क्लिक करा. यानंतर, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. शेवटी, विहित शुल्क भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट सुरक्षित ठेवा. दरम्यान, नोकरीच्या शोधात असणाऱ्या इंजीनियरसाठी ही मोठी संधी आहे. www.nlcindia.in या साईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
NLC भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील
NLC इंडिया लिमिटेड ( NLC ) ही भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील नेवेली येथे आणि राजस्थान राज्यातील बिकानेर जिल्ह्यातील बारसिंगसर इथं ओपनकास्ट खाणींमधून दरवर्षी सुमारे 30 दशलक्ष टन लिग्नाइटचे उत्पादन होते. वीज निर्मितीसाठी 3640 मेगावॅट स्थापित क्षमतेच्या पिटहेडथर्मल पावर स्टेशनवर लिग्नाइटचा वापर केला जातो. त्याच्या संयुक्त उपक्रमामध्ये कोळशाचा वापर करून 1000 मेगावॅटचे थर्मल पॉवर स्टेशन आहे. अलीकडे, त्याने अक्षय ऊर्जा उत्पादनात विविधता आणली आहे.
अधिकृत संकेतस्थळ – www.nlcindia.in
Recruitment for 28368 vacancies: विविध विभागात होणार २८,३६८ पदांची मोठी पदभरती!