State Bank Lipik Vacancy स्टेट बँकेत भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, Apply Now - Thejobwalaa

State Bank Lipik Vacancy स्टेट बँकेत भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, Apply Now

thejobwalaa.in- yogesh
2 Min Read

State Bank Lipik Vacancy स्टेट बँकेत भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, Apply Now

State Bank Lipik Vacancy: सरकारी नोकरीसाठी बारावी पास आणि पदवीधर विद्यार्थ्यांकडून जोमाने प्रयत्न सुरू असतात. सरकारी नोकरीसाठी जाहिरात कधी निघते आणि आपण कधी अर्ज भरतो, असेच त्यांचं नियोजन असते. त्यानुसार, लेखी परीक्षांची तयारी देखील त्यांच्याकडून केली जाते. बँकींग परीक्षा, पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीत ते स्वत:ला झोकून देऊन प्रयत्न करतात. या सर्व उमेदवारांना आता बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) लिपिक पदाच्या 50 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. त्यामुळे, इच्छुक व शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी (JOB) अर्ज करता येईल.

State Bank Lipik Vacancy

State Bank Lipik Vacancy | SBI Cleark Job

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदासाठी आरक्षण निहाय जागांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 50 जागांसाठी ही भरती निघाली असून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेल्या उमेदवाराला या नोकरीसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी, वयोमर्यादा किमान 20 आणि कमाल 28 ठेवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2024 रोजीच्या तारखेला अनुसरुन उमेदवाराचे वय ग्राह्य धरले जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 24 हजार ते 65 हजार रुपयांपर्यंतच वेतन मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली असून शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 ही आहे.

Engineer Government Job: इंजीनियर झालेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी, NCL मध्ये विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज0??

State Bank Lipik Vacancy शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात

आरक्षणनिहाय रिक्त जागांची वर्गवारी

  • SC: 4 पदे
  • ST: 5 पदे
  • OBC: 13 पदे
  • EWS: 05 पदे
  • सर्वसाधारण: 23 पदे

एकूण पदे – 50

  • मासिक वेतन
  • दरमहा 24,050-64,480 रुपये

असा करा अर्ज

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2024
  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in भेट द्या
  • होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ उघडेल.
  • तुमचा नोंदणी फॉर्म येथे भरा.
  • फी भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फॉर्म सबमिट करा.
  • त्याची प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
  • ऑनलाईन अर्जसाठी लिंक – https://sbi.co.in/
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *