Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ‘या’ 6 गोष्टी असेल तरच मिळणार पैसे, जाणून घ्या
Ladki Bahin Yojna: हिवाळी अधिवशेनाच्या पहिल्यात दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आता लवकरच या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार
Contents
त्याचबरोबर पुढील अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली जाणार असून लाडक्या बहिणींना आता पुढच्या वर्षीच 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच लाडकी बहीण योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची सरकारकडून पुन्हा तपासणी केली जाणार असून या पुनर्तपासणीमध्ये किंवा फेरपडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र आढळतील, त्यांचे अर्ज रद्द केले जातील.
लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता| Ladki Bahin Yojna
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी तत्त्वावर नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही.
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक कर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
अधिकृत संकेतस्थळ- ladakibahin.maharashtra.gov.in