लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरवात! किती रुपये मिळणार?
Ladki Bahin December Installment मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं. मात्र आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे.
Ladki Bahin December Installment
राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणे सहावा हप्ता मिळणार आहे.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा टप्पा सुरु होणार आहे.
Ladki Bahin Yojana Update : ठरलं! या तारखेला महिलांना मिळणार 2100 रुपये; आदिती तटकरेंनी दिली माहिती
मात्र डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. कारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
अधिकृत संकेतस्थळ- येथे बघा
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.