Ladki Bahin Yojana : महिला दिनी 'लाडकी'ला खास गिफ्ट, खात्यात खटाखट ₹1500 येण्यास सुरूवात - Thejobwalaa

Ladki Bahin Yojana : महिला दिनी ‘लाडकी’ला खास गिफ्ट, खात्यात खटाखट ₹1500 येण्यास सुरूवात

thejobwalaa.in- yogesh
1 Min Read

Ladki Bahin Yojana  महिला दिनी लाडकी’ला खास गिफ्ट, खात्यात खटाखट ₹1500 येण्यास सुरूवात

Ladki bahin yojana: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. कारण त्यांची प्रतीक्षा संपली आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात झाली आहे.

Ladki bahin yojana

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट दिले जात आहे. लाडक्या बहिणी पुढचा हफ्ता कधी मिळणार याची वाट पाहत होत्या. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. आज राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ३००० रूपये जमा होणार आहे. आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात होणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सांगितले की, ‘महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हफ्ता आज आपण महिलांच्या थेट खात्यात वितरित करत आहोत. आम्ही या दोन्ही महिन्यांचा लाभ महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार लाडक्या बहिणींना देण्यास सुरूवात केली आहे.

Low Cibil Score Loan सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 40,000 पर्यंत कर्ज

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *