Maharashtra loan महामुद्रा – प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाई)
Maharashtra loan : “महामुद्रा – प्रधानमंत्री मुद्रा योजना” वर आपले स्वागत आहे. मोबाइल फोन किंवा संगणकाद्वारे शक्य तितक्या कमी वेळेत प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्याची इच्छा असलेल्या लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्यासाठी हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
कर्ज मागणीचा अर्ज दाखल करणेसाठी आवश्यक कागदपत्रांची तसेच या प्रक्रियेबाबतच्या माहितीसाठी आता नागरिकाना बँकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन कधीही आणि कोठूनही माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे ज्यामुळे नागरिकांच्या वेळेची व श्रमाची बचत होऊ शकेल. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रधानमंत्री मुद्रा योजना अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी या संकेतस्थळाची निश्चित मदत होणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख विविध व्यवसायासंबंधीची माहिती तसेच त्याचे प्रशिक्षण कोठून घ्यावे इत्यादी प्रकाराची माहिती योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस या संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्याचा आमचा मानस आहे.
मुद्रा योजना (पीएमएमवाई)दृष्टी
समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी जागतिक पातळीवरील सर्वोत्तम पद्धती आणि मानदंडांशी एकात्मिक आर्थिक आणि आधार सेवा प्रदाता बनून एक उत्कृष्टतेचे बेंचमार्क म्हणून काम करणे.
Maharashtra loan
आर्थिक सहभाग आणि आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्याकरिता आमच्या भागीदार संस्थांच्या सहकार्याने एक समावेशक, स्थायी आणि मूल्य आधारित उद्योजकता संस्कृती निर्माण करणे.
आमचे मूलभूत उद्देश म्हणजे भागीदार संस्थांचा आधार आणि प्रोत्साहन आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रासाठी वाढीचे पारिस्थित यंत्रणा निर्माण करून समावेशक आणि टिकाऊ पद्धतीने विकास साधणे.
शिशु-50,000 / – पर्यंत कर्ज.
किशोर-50,000 / – ते 5 लाखांपर्यंत कर्ज
तरुण- 5 लाखावरील आणि 10 लाखांपर्यंतची कर्ज.
वेबसाईट- https://mahamudra.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx