Andhera News अंढेरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याच्या गाडीला अवैध दारू विक्रेत्याने लाथ मारल्यामुळे, एका पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू, तर दुसरा जखमी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू.
चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ ते मिसळवाडी यांच्यामध्ये ही दुर्दैवी घटना 23 मार्च दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. प्राप्त माहिती गुसार अंडेरा पोलीस स्टेशनचे राम आंधळे आणि भागवत गीरी हे पोलीस कर्मचारी दुचाकीने शेळगाव हटिल ने मिसळवाडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. अवैध्य दारू विक्रेता शिवणकर नामक अवैध दारू वाहतूक करणारा अवैध दारूचे बॉक्स घेऊन शेळगाव आटोळे येत होता ही माहिती अंडेरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याऱ्यांना मिळाल्यानंतर या दोन पोलीस कर्मचाऱ्याऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र अवैध दारू वाहतूक करणारा शिवणकर हा दुचाकी वर एकटाच समोर दारूचे बॉक्स घेऊन जात होता.
पाठलाग करत असतानाच अपेडा दारू वाहतूक करणाऱ्याने पोलीस कर्मचान्यांच्या दुचाकी लाथ मारली, त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडकली त्यातच दुचाकी चालवणारे भागवत गिरी पोलीस कर्मचारी यांचा जागीच मृत्यू आला. पोलीस कर्मचारी राम आंधळे हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर जवळून कृष्णा मिसाळ जात असताना त्यांनी तात्काळ विलंब न करता जखमी पोलीस कर्मचारी कृष्णा मिसाळ यानी चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तोपर्यंत अवैध दारू वाहतूक करणारा घटनास्थळावरून त्याने पोबारा केला, पसार झाला. घटनेची माहिती मिळताच अढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. या घटनेवरून अवैध दारू विक्रेत्यांची चांगलीच हिम्मत वाढलेली दिसते. आतातरी संपूर्ण अवैध्य दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करावी अशी जनतेमध्ये चर्चा होत आहे.loan
instant loan for unemployed भारतातील बेरोजगारांसाठी तातडीचे कर्ज